top of page
Plant Shadow
Ramanandacharyaji's awards & recognition (6).jpg

जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे गौरव

जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी हे केवळ अध्यात्मिक गुरुच नाहीत, तर धर्मसंवर्धन, समाजसेवा, राष्ट्रप्रेम आणि मानवतेच्या कल्याणासाठी अविरत कार्य करणारे युगपुरुष आहेत. त्यांच्या या अद्वितीय कार्याचा सन्मान म्हणून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान व पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हे सन्मान केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नव्हे, तर त्यांच्या कार्याच्या व्यापकता, प्रभाव आणि अध्यात्मिक तेजाचे प्रतीक आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान

वर्ष 2000 – “शिवतेज पुरस्कार”

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या हस्ते जगद् गुरुश्रींना ‘शिवतेज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार धर्मसंरक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाची दखल म्हणून दिला गेला.

11 एप्रिल 2004 – ‘धर्माचार्य आणि पीठाधीश्वर’ पदवी

श्री महंत ग्यानदासजी महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषद आणि राम जन्मभूमी पुनरुद्धार समिती, हनुमानगढी अयोध्या) यांच्या हस्ते उज्जैन येथे जगद् गुरुश्रींना ‘धर्माचार्य’ आणि ‘पीठाधीश्वर’ या पदव्या प्रदान करण्यात आल्या.

21 ऑक्टोबर 2005 – ‘जगद् गुरु रामानंदाचार्य’ पदवी

अयोध्येत, अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषद, वैष्णव सर्व आखाडे, उप-आखाडे, चतुःसंप्रदाय आणि खालसे यांच्या उपस्थितीत जगद् गुरु रामानंदाचार्य हरीयाचार्यजी यांच्या हस्ते नरेंद्राचार्यजींना ‘जगद् गुरु रामानंदाचार्य’ या सर्वोच्च पदावर विराजमान करण्यात आले.

26 मे 2008 – ‘समाजसेवा पुरस्कार’

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या तर्फे समाजहितार्थ केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी जगद् गुरुश्रींना ‘समाजसेवा पुरस्कार’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.

5 डिसेंबर 2008 – ‘वीर जिवा महाला पुरस्कार’

वाई, सातारा येथे शिवप्रतापगड उत्सव समितीच्या अध्यक्षा विजया राजे भोसले यांच्या हस्ते “वीर जिवा महाला पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

25 मे 2009 – ‘वीर सावरकर पुरस्कार’

मुंबई येथे विनायक सावरकर यांचे नातू विक्रम सावरकर यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘वीर सावरकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

20 फेब्रुवारी 2010 – ‘राष्ट्रसंत’ पदवी

शिव प्रतिष्ठान, कोल्हापूरचे अध्यक्ष भिडे गुरुजी यांच्या हस्ते जगद् गुरुश्रींना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले.

20 ऑगस्ट 2010 – ‘धर्माचार्य ब्रह्मचारी विश्वनाथजी पुरस्कार’

मा. डॉ. मोहनराव भागवत (सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांच्या हस्ते धर्माचार्य ब्रह्मचारी विश्वनाथजी पुरस्कार’ हा सन्मान देण्यात आला.

14 एप्रिल 2012 – अंतरराष्ट्रीय शांतता सन्मान

J.N.M.G. Foundation Inc., अमेरिका या संस्थेकडून जगाला “बंधुता, शांतता आणि तणामुक्त जीवनाचा संदेश” देणाऱ्या जगद् गुरुश्रींना एडवर्ड पी. मंगानो (नासाऊ काउंटी एक्झिक्युटिव्ह) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याची दखल घेऊन न्यू जर्सी विधानसभेने १५ एप्रिल २०१२ रोजी एक ठराव पारित करून त्यांचे स्वागत केले.

23 डिसेंबर 2016 – ‘धर्मसंस्कृती महाकुंभ पुरस्कार’

श्रीमद्‌ जगद् गुरु शंकराचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (ज्योर्तिमठ, बद्रीनाथ) यांच्या हस्ते समाजसेवा आणि धर्मसंवर्धनासाठी हा “धर्मसंस्कृती महाकुंभ पुरस्कार”

जगद् गुरुश्रींना देण्यात आला.

14 जून 2022 – ‘राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान’

महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला.

14 फेब्रुवारी 2025 – ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’

अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यातर्फे समाजसेवा आणि समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

20 फेब्रुवारी 2025 – ‘राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान’

महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदकडून पुन्हा एकदा त्यांच्या मानवसेवेच्या कार्यासाठी ‘राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्र रक्त संक्रमण बँकेकडून जगद् गुरुश्रींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाते.

14 जून 2025 – इंडियन रेड क्रॉस सोसायटी सन्मान

जागतिक रक्तदाता दिनाच्या औचित्याने इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे तेलंगणा राज्याचे महामहिम राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते जगद् गुरुश्रींना ‘इंडियन रेड क्रॉस सोसायटी सन्मान’ हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

या सर्व गौरवांनी जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित न राहता जगभरात पोहोचल्याचे दर्शन घडते. त्यांच्या अध्यात्मिक तेजाने, धर्मसंवर्धनाच्या प्रयत्नांनी आणि अखंड मानवसेवेने त्यांना मिळालेले हे पुरस्कार हे केवळ सन्मान नाहीत, तर ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या दिव्य कार्याचे प्रमाणपत्र आहेत.

bottom of page