top of page
Plant Shadow
website swamiji images.png

रामानंदाचार्यजींचे बहुआयामी व्यक्तिमत्व

जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी हे एक अद्वितीय आणि दूरदर्शी नेतृत्वकर्ता आहेत, ज्यांचे कार्यक्षेत्र अध्यात्म, सामाजिक सुधारणा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि मानवसेवा इतके विस्तृत आहे. त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व खालील पैलूंमध्ये प्रकट होते.

उत्कृष्ट नियोजक
 

जगद् गुरु नरेंद्राचार्य प्रत्येक वर्षाचा संपूर्ण कार्यक्रम दिड वर्ष आधी आखतात व दिनदर्शिका प्रसिद्ध करतात. प्रत्येक उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करूनच सुरुवात केली जाते, त्यामुळे सुरू केलेले कोणतेही कार्य कधीही थांबत नाही.

कुशल प्रशासक आणि व्यवस्थापक

जगद् गुरु  नरेंद्राचार्य महाराज संस्थान” आणि “संजिवन ट्रस्ट” सारख्या संस्थांची स्थापना करून त्यांनी व्यवस्थापन, समन्वय आणि कार्यप्रगतीसाठी आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केल्या. त्यांच्या प्रेरणेने लाखो लोक सामाजिक सेवेशी जोडले गेले आहेत.

वास्तुकला व पायाभूत सुविधा तज्ज्ञ

नाणीजधाम आणि देशभरातील १२ उपपीठे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारली गेली आहेत. मंदिर, सभागृहे आणि प्रवचन मंचांसह अनेक इमारती आणि प्रत्येक ठिकाणचा परिसर  त्यांनी वैयक्तिक सहभाग घेऊन तेथे आध्यात्मिक वातावरण तयार केले आहे.

कवी आणि लेखक

१८ दिवसांत ३,०५१ ओव्यांचे “श्री लीलामृत” हे महाकाव्य त्यांनी रचले, ज्यात सांसारिक जीवनात अध्यात्म आणि मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांतून अध्यात्मिक विचारांचा प्रसार होतो.

विलक्षण वक्ते

त्यांची प्रवचने साध्या, प्रभावी आणि हृदयाला भिडणाऱ्या शब्दात असतात. गुंतागुंतीचे विषयही ते सोप्या भाषेत समजावतात, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही ज्ञान सहज प्राप्त होते.

जीवन-मार्गदर्शक

त्यांची “त्रिसूत्री” – डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी, बुद्धी वास्तववादी – जीवनातील अडचणींवर प्रकाश टाकते. ते लोकांना अंधश्रद्धेपासून दूर ठेवून ज्ञानाचा मार्ग दाखवतात आणि आत्मविश्वास वाढवतात.

संघटन कौशल्यात पारंगत

त्यांनी युवा सेना, महिला सेना, पुरुष सेना आणि हिंदू संग्राम सेना स्थापन करून समाजसेवेला लोकचळवळ बनवले. विविध घटकांतील लाखो लोकांना एकत्र आणून त्यांनी सामूहिक कार्यशक्ती निर्माण केली.

धर्मरक्षक

त्यांनी लाखो कुटुंबांना आता पर्यंत पुन्हा सनातन धर्मात आणले आहे आणि १५,४०० आंतरसमुदाय विवाह घडवून सामाजिक ऐक्य वाढवले आहे. याशिवाय जातीभेद दूर करण्यासाठी आणि धर्मसंरक्षणासाठी ते क्रांतिकारी उपक्रम राबवतात.

समाजसुधारक

सर्व जातींसाठी वेदपाठशाळा सुरू करून ज्ञानाचा अधिकार सार्वत्रिक केला. देहदान-अवयवदान, अंधश्रद्धा व हुंडा निर्मूलन, वेदविज्ञान शिक्षण अशा उपक्रमांद्वारे त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थान घडवले.

कुशल तंत्रज्ञानी

आयटी तंत्रज्ञानाचा वापर करून १७ ॲप्लिकेशन्स विकसित केले आणि सेवा कार्य अधिक वेगवान व परिणामकारक केले. १५०–२०० अभियंत्यांच्या मदतीने तांत्रिक प्रगती व अध्यात्म यांचा संगम घडवला.

निसर्गरक्षक

ग्लोबल वॉर्मिंगविरोधात त्यांनी पदयात्रा, वृक्षारोपण, पाणी अडवणूक, सौरऊर्जा, नेट झिरो असे उपक्रम राबवत आहेत. पर्यावरणरक्षण हेच धर्मपालन असल्याच्या भावनेने त्यांनी कार्य उभारले आहे.

उत्कृष्ट समाजसेवी

आपत्ती काळात अन्न, वस्त्र, औषधे, ॲम्बुलन्स सेवा, आर्थिक मदत पुरवली. ५३ ॲम्बुलन्स सेवा, रक्तदान, जनावरांना चारा वितरण, रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबन योजनांद्वारे लाखो जीवनांना आधार दिला. त्यांच्या सेवाकार्याचा विस्तार सतत वाढत असून ते पूर्णतः विनामूल्य, निःस्वार्थ आणि अखंड आहेत.

सर्व युगांसाठी एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व

जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य हे नियोजन, व्यवस्थापन, साहित्य, धर्म, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सेवा अशा सर्व क्षेत्रांत कार्यरत असलेले युगपुरुष आहेत. त्यांच्या कार्यातून धर्म, विज्ञान, समाजसेवा आणि मानवतेचा अद्वितीय संगम घडून आला आहे.

bottom of page