

जगद् गुरु रामानंदाचार्य पदावर पट्टाभिषेक
महंत नरेंद्रदास यांचे अध्यात्म-धर्म-समाजसेवेचे कार्य दिवसेंदिवस वाढत असल्याने, अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेने वैष्णव परंपरेतील आद्य जगद् गुरु रामानंदाचार्य यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.
२१ ऑक्टोबर २००५, अयोध्या या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत, भव्य समारंभात महंत नरेंद्रदास यांचा जगद् गुरु रामानंदाचार्य म्हणून पट्टाभिषेक झाला.
समारंभात उपस्थित प्रमुख संत आणि प्रतिनिधी
-
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदासजी महाराज
-
आखाडा परिषदेचे सदस्य
-
निर्वाणी, निर्मोही, दिगंबर आणि त्यांच्या १८ उप-आखाड्यांचे प्रतिनिधी
-
चतुःसंप्रदाय यांचे प्रमुख, सर्व वैष्णव खालसे यांचे पदाधिकारी
-
उदासीन, बड़ा उदासीन, निर्मल आखाडे
त्या दिवसापासून महंत नरेंद्रदास जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य झाले. अनंत श्री विभूषित; हिंदू धर्मगुरू आणि वैष्णव आचार्य म्हणून, तसेच आद्य जगद् गुरु रामानंदाचार्याचे उत्तराधिकारी संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे सुपूर्द झाले.
नाणीजधाम चा उदय आणि दक्षिण पीठाची स्थापना
याच दिवशी नाणीज गावाचे “नाणीजधाम” असे रूपांतरण झाले. आद्य जगद् गुरु रामानंदाचार्यांचे दक्षिणेकडील पीठ म्हणून येथे “रामानंदाचार्य दक्षिणपीठ – नाणीजधाम” असे नामकरण झाले.
आद्य जगद् गुरु रामानंदाचार्यांची तीन प्रमुख पीठे:
-
श्री मठ – पंचगंगा घाट, वाराणसी (मूळ पीठ) पीठाधीश्वर – रामानंदाचार्य रामनरेशाचार्य
-
तुलसीपीठ – चित्रकूट, मध्यप्रदेश, पीठाधीश्वर – रामानंदाचार्य रामभद्राचार्य
-
रामानंदाचार्य दक्षिणपीठ – नाणीजधाम, महाराष्ट्र, पीठाधीश्वर – रामानंदाचार्य नरेंद्राचार्य
प्रभुरामांच्या कार्यांचा पुनर्जन्म
श्रीरामांच्या अवतारकाळात, धर्ममार्तंडाच्या सल्ल्याने त्यांनी एका शूद्राचा वध केला होता. त्या काळी वैदिक उपासनेचा अधिकार फक्त ब्राह्मण-क्षत्रियांना होता. हे कर्म त्यांच्या अंतःकरणावर शल्यासारखे राहिले, असे मानले जाते. धर्मरक्षण-संवर्धनासाठीच ते पुनः विक्रम संवत १३५६, माघ कृष्ण सप्तमी (इ.स. १२९९) रोजी आद्य जगद् गुरु रामानंदाचार्य म्हणून अवतरले. आर्ष ग्रंथ म्हणतात:
“रामानंदा स्वयं रामः, प्रादुर्भूतो महीतले.”
अर्थ: “स्वतः भगवान श्रीरामच आद्य जगद् गुरु रामानंदाचार्यांच्या रूपाने पृथ्वीवर प्रकट झाले.”
वैदिक सनातन धर्मात वाढलेल्या जाती-पाती-अस्पृश्यतेच्या विषवेलीस मूळासकट उपटण्यासाठी आद्य जगद् गुरूंनी उद्घोष केला.
“जात पात पुछे ना कोई | हरी को भजे सो हरी का होई.”
अर्थ - “जात-पात विचारूच नयेत; जो हरीचे भजन करतो तोच हरीचाच आहे.”
रामानंदाचार्यांनी फक्त असा उपदेशच केला नाही; तर संत कबीरदास, रविदास, सेन नाई, धन्ना जाट, नाभा दास अशा ब्राह्मणेतर संतांना शिष्य म्हणून स्वीकारले. तसेच संत सुरासुरी, संत पद्मावती यांसारख्या स्त्रियांनाही आत्मोद्धाराचा अधिकार दिला; त्या काळातील जात-लिंग भेद मोडून काढले.
धर्मरक्षणातील ऐतिहासिक योगदान
१३ व्या शतकात, दिल्ली सल्तनतीतील मोहम्मद गियासुद्दीन तुघलक यांच्या राजवटीत हिंदूंचे इस्लामीकरण प्रयत्न वेगाने होत होते; त्यास प्रतिबंध करण्यास रामानंदाचार्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. आणि आज असे वाटते की जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य हेच त्या अपूर्व कार्याची पूर्तता करण्यासाठी जन्मास आले आहेत.




