top of page
Plant Shadow
website bg (2).png

ध्येय आणि दृष्टीकोन

जगद् गुरु रामानंदाचार्यजींची दूरदृष्टी

परमेश्वराने मानवजातीला दोन अतिशय मौल्यवान देणग्या दिल्या आहेत. वेळ, ज्याला जीवन म्हटले जाते, आणि मानवी देह. जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या मते, या दोन्हींचे योग्य नियोजन आणि योग्य उपयोग केल्यास, मानवी देहाच्या माध्यमातून असंख्य परोपकारी आणि लोकहिताचे कार्य साध्य होऊ शकते.

आपल्या जीवनाचा प्रवास दूरवर पोहोचणारा, गतिशील आणि सुबद्ध राहावा यासाठी, जगद् गुरूंनी सन १९९७ पासून दरवर्षी एक सविस्तर वार्षिक दिनदर्शिका तयार करण्यास सुरुवात केली. ते दरवर्षी अशी दिनदर्शिका तयार करतात आणि त्या नियोजनानुसार स्वतःची दिनचर्या काटेकोरपणे पार पाडतात. या दिनदर्शिकेत त्यांच्या सर्व ३६५ दिवसांच्या कार्याचे सूक्ष्म नियोजन केलेले असते. आगामी वर्षासाठीची ही दिनदर्शिका प्रत्येक वर्षी २१ ऑक्टोबरला म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच अनुयायांना उपलब्ध करून दिली जाते.

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा उद्देश आणि दृष्टिकोण

गरीब-दुबळ्यांबद्दल अपरंपार करुणा बाळगणारे, सत्यनिष्ठ, नि:स्वार्थ परोपकाराची वृत्ती अंगी असलेले स्वामी नरेंद्राचार्य यांनी “दीन-दुबळ्यांची सेवा हीच ईश्वरी सेवा” अशी धारणा ठेवली. दूरदर्शी दृष्टिकोन, समाजाविषयीचा कळवळा आणि धर्माबद्दलची अपार आपुलकी यांसह त्यांनी सांगितले की सनातन वैदिक धर्म आणि प्राचीन भारतीय संस्कृती अवश्य जपली. संवर्धली पाहिजे कारण हाच विश्वासाठी प्रबळ प्रेरणेचा महान स्रोत आहे. त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले की हिंदू संस्कृतीतच इतरांना ज्ञानरूपी “अमृत” पाजण्याचे सामर्थ्य आहे; आणि ह्याच विश्वासाने त्यांनी धर्म-अध्यात्माचे कार्य सर्वदूर विस्तारले.
 

नरेंद्राचार्यांची जीवन-मार्गदर्शक “त्रिसूत्री”:

  • डोळे विज्ञानवादी ठेवा.

  • मन अध्यात्मवादी ठेवा.

  • बुद्धी वास्तववादी ठेवा.

ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास अज्ञानावर मात करता येते.

असाधारण नेतृत्व आणि सर्वांगीण कार्य
 

अत्यंत सूक्ष्म नियोजनकुशलता, उत्तम प्रशासकीय व व्यवस्थापकिय क्षमता, वास्तुकौशल्य, काव्य-लेखन प्रतिभा, प्रभावी वक्तृत्व, जीवन-मार्गदर्शन, संघटन नेतृत्व, धर्मरक्षण, समाजसुधारणा, तंत्रज्ञान प्रावीण्य, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवा या सर्व गुणांमुळे नरेंद्राचार्य अल्पावधीत महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर वर्षी २१ ऑक्टोबर (जन्मदिन) या दिवशी पुढील वर्षाचे कॅलेंडर प्रकाशित होते; त्यात साधनेच्या तारखा देखील असतात आणि त्या दिवशी ते अवश्य ध्यान-साधना करतात.

bottom of page