

एकाच तत्वाचा अखंड प्रवाह
आद्य जगद् गुरु रामानंदाचार्य आणि जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य
रामानंदाचार्य आणि नरेंद्राचार्य यांतील आश्चर्यकारक साम्य
नरेंद्राचार्यांच्या कार्याचा अभ्यास केला असता (त्यांच्या सन १९९२ पासून ग्रंथांत नोंदविल्यानुसार) आणि भगवान आद्य जगद् गुरु रामानंदाचार्यांच्या प्राचीन ग्रंथांतील अभ्यासावरून भगवान आद्य जगद् गुरु रामानंदाचार्यांच्या चरित्राचा विचार केला असता, या दोन्ही दिव्य व्यक्तिमत्त्वांमध्ये आश्चर्यकारक साम्य आढळते:
जन्मदिवस:
दोघांचाही जन्म शुक्रवार या दिवशी झाला.
आवडते अन्न:
दोघांनाही खीर (गोड पायसं) आवडते.
गोत्र:
दोघेही वसिष्ठ गोत्राचे आहेत.
करुणा:
दोघांच्याही अंतःकरणात गरीब-दुबळ्यांबद्दल अपरंपार सहानुभूती आहे.
समानता:
दोघांनीही जात-पात, शुद्ध-अशुद्ध प्रथा व सामाजिक भेदभाव नाकारले.
तत्वज्ञान:
दोघांनीही विशिष्टाद्वैत सिद्धांताचा स्वीकार केला. म्हणजे परमेश्वर सर्वत्र व्यापून आहे, असे मत.
वैश्विक दृष्टी:
दोघांनीही “हरी (विष्णू) आणि हर (शिव)” यांच्यामध्ये एकच ब्रम्ह्तत्व आहे आणि ते सर्व व्यापी असून ते सूक्ष्म कणापासून विशाल ब्रह्मांडापर्यंत व्यापते, असा उपदेश केला.
धर्माचे रक्षण:
दोघेही सनातन धर्माच्या रक्षणासाठी सतर्क राहिले आणि हिंदू धर्माची पायाभरणी तळागाळापासून उच्चस्तरापर्यंत मजबूत केली.
सामाजिक परिवर्तन:
शिक्षण, सेवा आणि धार्मिक मार्गदर्शनाद्वारे दोघांनीही समाजात परिवर्तन घडवून आणले.
मानवतावादी कार्य:
शिक्षण, बेरोजगारी, आपत्ती मदत आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसारख्या सामाजिक समस्यांवर त्यांनी आपले कार्य केंद्रित केले.
